Home अकोले राजूर: सर्वोदय शाळेत शिक्षक पालक सह विचार सभा,  सर्वोदय पॅटर्न राबविण्यात येणार

राजूर: सर्वोदय शाळेत शिक्षक पालक सह विचार सभा,  सर्वोदय पॅटर्न राबविण्यात येणार

राजूर: सर्वोदय शाळेत शिक्षक पालक सह विचार सभा, सर्वोदय पॅटर्न राबविण्यात येणार

राजूर | Rajur: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात पालक व शिक्षक सह विचार सभा पालकांचे प्रतिनिधी प्राचार्य. श्री. मनोहर लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्छात पार पडली. या वर्षापासून सर्वोदय पॅटर्न राबविण्यात येणार असून दर रविवारी स्पर्धा परीक्षेसाठी बाहेरचे अनुभवी शिक्षक किंवा माजी विद्यार्थी कि जे आज सनदी अधिकारी आहेत. ते मार्गदर्शन करणार आहेत.उन्हाळ्यात जादा तासांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जेष्ठ प्राध्यापक सुनील पाबळकर यांनी दिली.

प्रास्ताविक प्राध्यापक संतोष कोटकर यांनी केले. उपप्राचार्य श्री.पर्बत सर यांनी पालकांनी जागरूक राहून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे म्हंटले. प्राचार्य श्री, मनोहर लेंडे म्हणाले मुले ही आजच्या राष्ट्राची संपती आहे प्रत्येक पालकाने मुलांशी मैत्रीपूर्वक संवाद साधल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणात उर्जा मिळते. एक आदर्श विद्यार्थी पाल्य घडतो असे मत व्यक्त केले. प्राध्यापक अजित गुंजाळ यांनी आभार मानले. सहविचार सभेस गणेश मैड, अजय पवार, प्रकाश हेकरे, किसन भांगरे, सुंदराताई काठे, आसाराम कानकाटे , अक्का कोंडावळे आदी उपस्थित होते.

Website Title: Sarvodaya Vidya mandir Rajur Sarvoday pattern 


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here