Home अकोले सर्वोदय विद्यालयात आंतरविद्यालयीन गणित व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

सर्वोदय विद्यालयात आंतरविद्यालयीन गणित व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Akole News:  विद्यार्थ्यांमधील संशोधक शोधावेत. त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक होईल. (Mathematics and Science Exhibition)

Sarvodaya Vidyalaya's Inter-School Mathematics and Science Exhibition

राजूर: सत्यनिकेतन संचालित गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरविद्यालयीन गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अॅड. एम.एन. देशमुख महाविद्यालयातील प्रा. डॉ. टपले सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उप प्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, प्रा. डॉ. गिते व्ही. एम. उपस्थित होते.

शिक्षकांनी अध्यापन करताना आपल्यातील नवीन संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडाव्यात. विद्यार्थ्यांमधील संशोधक शोधावेत. त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक होईल असा विश्वास अॅड. एम.एन. देशमुख महाविद्यालयातील प्रा. डॉ. टपले सर यांनी व्यक्त केला.

विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी, बालवयात संशोधन वृत्ती जोपासली जावी, यासाठी गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्याच्या सजन शीलतेला वाव देणारे आहे. शाळेच्या चार भिंती बाहेरचे उपक्रम हे प्रेरणा देणारे असून विज्ञानाची कास धरल्यानेच आपल्या देशाची प्रगती झाली असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञान प्रदर्शनावर अवलंबून न राहता  विज्ञानात पुढे प्रगती करायची असेल तर शासनस्तरावर असलेल्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.

प्रा. डॉ. टपले पुढे म्हणाले की, देशातीलच नव्हे जगातील अनेक शास्त्रज्ञानां संशोधन करताना पहिल्याच प्रयत्नात अपयश आले मात्र त्यांनी त्यात पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि शोध लावले. विद्यार्थ्यांनीही आपल्यातील संशोधन वृत्ती वाढवावी ,प्रत्येक बाबीचे निरीक्षण करून त्याची नोंद ठेवावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे धडे देऊन त्यांच्या विचारांना चालना द्या, अशा विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील संशोधन केंद्रांमध्ये सहलीचे आयोजन करत त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा असे मार्गदर्शन करत उज्वल भारत घडविण्यासाठी संस्कारक्षम पिढी घडवा असे आवाहन प्रा. डॉ. टपले सर यांनी केले.

सदर प्रदर्शनामध्ये 9 ते 12 विज्ञान गटामध्ये एकूण 32 उपकरणे व गणित गटांमध्ये एकूण 13 उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केले. तसेच 6 ते 8 विज्ञान गटामध्ये 17 व गणित गटामध्ये 8 उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केले. तसेच 1ते 5 गटामध्ये एकूण 8 विज्ञान गटांमध्ये व गणित गटांमध्ये एकूण 8 असे एकूण  86 उपकरणे मांडण्यात आले. प्रा. डॉ. टपले सर, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उप प्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, प्रा. डॉ. गिते व्ही. एम. यांनी उपकरणांची परीक्षण केले.

विज्ञान विभाग प्रमुख रवींद्र मढवई व सौ. रोहिणी सानप यांनी या कार्यक्रम नियोजन पार पाडले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक संजय व्यवहारे, आर. पी. पांडे, अमोल तळेकर, राजेविनोद साबळे, संजय देशमुख, दिंडे सर, नाना शिंदे, शरद तुपविहीरे, संतोष कोटकर, अजित गुंजाळ, विकास जोरवर, हेकरे सर, चिंधे सर, बारामते सर, बेनके सर, राठोड मॅडम, वाळूंज मॅडम, नवाळी मॅडम, बिडवे मॅडम, पवार मॅडम, सोनार मॅडम, खराटे मॅडम आदी सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Sarvodaya Vidyalaya’s Inter-School Mathematics and Science Exhibition

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here