Home संगमनेर थोरातांच्या भेटीला गेलेल्या शुभांगी पाटलांबद्दल सत्यजीत तांबे म्हणाले…

थोरातांच्या भेटीला गेलेल्या शुभांगी पाटलांबद्दल सत्यजीत तांबे म्हणाले…

Nashik graduate constituency election | Satyajeet Tambe : शिक्षक पेंशन योजना मिळविण्यासाठी आपण लढा देणार.

Satyajeet Tambe said about Shubhangi Patil who visited Thorat.

Satyajeet Tambe: नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून रिंगणात असलेले सत्यजीत तांबे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. वडील सुधीर तांबे यांनी १५ वर्षांमध्ये पदवीधरांची, शिक्षकांची मन जिंकली आहेत. त्यांनी अनेक कामे मार्गी लावली; त्यामुळे आपल्याला ही निवडणूक सोपी जाणार असल्याचं तांबे म्हणाले.

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, सुधीर तांबेंनी १५ वर्षात शिक्षकांची मन जिंकण्याचं काम केलं आहे. मी देखील  नाशिक विभागातील पदवीधरांना न्याय देण्याचं काम करेन. शिक्षक पेंशन योजना मिळविण्यासाठी आपण लढा देणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आज आम्हाला नाशिक विभागातील एनडीएसटीने पाठिंबा दिला आहे. कनिष्ठ महाविद्यालय महासंघानेही पाठिंबा दिला असल्याचं तांबे म्हणाले.

‘सर्व राजकीय प्रश्नांची उत्तरं मी सविस्तरपणे देणार आहे. आज ती वेळ नाही, असं सत्यजीत म्हणाले. मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील बाळासाहेब थोरातांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यावर त्यांना प्रश्न विचारला असता. त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचं ते म्हणाले.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

दरम्यान, शुभांगी पाटील ह्या काल बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेल्या होत्या. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. विशेष म्हणजे थोरातांच्या गेटवरच त्यांना अडवलं गेलं. त्यांनी बाळासाहेब थोरातांना फोनही फिरवला. परंतु त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही.

दरम्यान, काँग्रेसने सत्यजीत तांबे यांच्याऐवजी वडील सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली होती. ऐनवेळी सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्षाकडून दोघांवरही कारवाई करण्यात आली.

Web Title: Satyajeet Tambe said about Shubhangi Patil who visited Thorat.

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here