अहमदनगर: ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: ट्रकच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना.
नेवासा: नेवासा तालुक्यातील माका येथे ट्रकच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर अपघात करुन मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्तिकी गोकुळ भताणे (वय १२) ही पांढरीपूल ते शेवगाव रोडवरून शाळा सुटल्यावर सायकलवरुन घराकडे जात असताना ट्रक (एमएच १४ ईएम ७९२७) ने मुलीला मागील बाजूने जोराची धडक देऊन अपघाताची खबर न देता पसार झाला.
आरोपी चालक अनिल सखाराम राठोड रा. अंबड जिल्हा जालना याचे विरुद्ध मुलीचे नातेवाईक बालादित्य बाबासाहेब घुले रा. माका यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा र. नं. १४८/२०२४ भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आप्पा तमनर हे करत आहेत.
Web Title: school girl died in a collision with a truck Accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study