Home अहमदनगर राज्यातील शाळा:  कोणत्या जिल्ह्यात कधी सुरु होणार शाळा जाणून घ्या

राज्यातील शाळा:  कोणत्या जिल्ह्यात कधी सुरु होणार शाळा जाणून घ्या

School reopen in state Date

राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या असून यामध्ये बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतचे वर्ग सुरु राहणार आहे. मात्र अद्यापही राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. रुग्णसंख्या वाढत आहे.

यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. तसेच अद्यापही काही ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सुरु राहणार आहेत.

राज्यात कुठे शाळा बंद आणि सुरु राहणार

या जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरु

मुंबई : पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत.

ठाणे : पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत.

नाशिक : पहिली ते बारावीचे वर्ग आहेत.

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरु होणार मात्र शहरी भागातील शाळा तूर्तास बंद राहणार

औरंगाबाद : फक्त दहावी आणि बारावी वर्ग सुरु होतील.

नंदुरबार : फक्त पहिली ते चौथीचे वर्ग ऑनलाईन सुरु राहणार आहेत. पाचवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरु राहणार आहेत. शाळांची वेळ 11 ते 3 पर्यंत असेल.

जालना : शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग तर ग्रामीण भागात पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु राहणार आहेत. जिल्ह्यात एकूण शाळा 2218 शाळा आहेत.

सातारा : पहिली ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार आहेत.

लातूर : संपूर्ण जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार असून शहरी भागातील शाळा तूर्तास बंद राहणार आहेत.

परभणी : जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असून पहिली ते आठवीच्या शाळा तूर्तास बंद असणार आहेत.

नांदेड : नववी ते बारावीच्या शाळा सुरु होणार असून पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहणार आहेत.

उस्मानाबाद : दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु होत असून इतर वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय 29 जानेवारीला होणार आहे

वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत.

गडचिरोली : पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळांमधील पहिली ते चौथीचे वर्ग बंद राहणार आहेत.

शाळा सुरु न होणारे जिल्हे

कोल्हापूर : 25 जानेवारीपासून पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार

नागपूर : 26 जानेवारी रोजी आढावा घेऊन निर्णय जाहीर होणार

सांगली : 1 फेब्रुवारी पासून पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार

पालघर : 8 ते 12 वीचे वर्ग 27 जानेवारी पासून सुरु होणार आहेत.पहिली ते सातवीच्या शाळा तूर्तास बंद राहणार आहेत.

धुळे : आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार आहेत. सध्या प्राथमिक शाळा या बंद असणार आहेत.

चंद्रपूर : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय झाला नाही आहे.

रत्नागिरी : शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.

वाशीम : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी ला निर्णय होणार आहे.

यवतमाळ : 27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार आहेत. पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहणार आहेत.

अहमदनगर : शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारी ला निर्णय होणार आहे.

रायगड : शाळा सुरु करण्या संदर्भात आज जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.

सोलापूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अजून निर्णय नाही.

बुलडाणा : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही.

बीड : अजून तूर्तास निर्णय नाही आज संध्याकाळी यासंदर्भात बैठक होणार आहे.

गोंदिया : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही.

भंडारा : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही.

अमरावती : कोरोनाची वाढती आकडेवारी बघता पुढचा एक आठवडा जिल्ह्यातील शाळा बंद असणार आहेत.

पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय हा पुढच्या आठवड्यात होणार आहे.

सिंधुदुर्ग : शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय होणार आहे.

Web Title: School reopen in state Date

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here