अहमदनगर जिल्ह्यात या कारणामुळे १४४ कलम लागू
अहमदनगर | Ahmednagar : जिल्ह्यात राजकीय पक्ष, संघटना यांचे वतीने रस्ता रोको, मोर्चा, धरणे आंदोलन इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असतात त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एस. टी. महामंडळाचे विविध संघटनांनी एस.टी. कर्मचारी विलगीकरण राज्य शासनामध्ये व्हावे, कर्जमाफी, कामगार करार इत्यादी मागण्यांसाठी बंद पुकारलेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात ११ ठिकाणी एस.टी. महामंडळ कर्मचारी आंदोलन सुरु आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा हद्दीत २८ नोहेंबर पर्यंत १४४ कलम लागू केला आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत १४४ कलम लागू असणार आहे.
Web Title: Section 144 is applicable in Ahmednagar