संगमनेर तालुक्यात साडेसात तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरीला
Ahmednagar Sangamner News: साडेसात तोळे सोन्यासह १६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा (Theft), उंबरी बाळापूर येथील घटना, गुन्हा दाखल.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे बुधवारी रात्री चोरट्यानी घरातून साडेसात तोळे सोन्यासह १६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. दत्तात्रय निवृत्ती सातपुते यांच्या घरात ही चोरीचा प्रकार घडला आहे. याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीला गेलेला ऐवज:
घरातून ७५ हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ५० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचा राणीहार, २५ हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे डोरले, २५ हजार रुपये किमतीच्या एक तोळे वजनाच्या तीन अंगठ्या तसेच १२ हजार ५०० रुपये किमतीच्या अर्धा तोळा वजनाच्या लहान मुलांच्या सोने- चांदीच्या दागिन्यांबरोबरच १६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात दत्तात्रय सातपुते यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये उंबरी बाळापूर शिवारातील गट नबंर १३ मध्ये माझे राहते घर आहे. मी २२ मार्च रोजी येथे सासुरवाडीला कामानिमित्त गेलो होतो. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास मुलगा राहुल याने घरी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यामुळे मी रात्री १.३० वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर सुनेने सांगितले की, रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठले असता काळे कपडे व मास्क घातलेली व्यक्ती किचनमध्ये उचकापाचक करत होती. त्यामुळे तिने घाबरून घरातील इतरांना जागे केले. घरातील व्यक्ती जागे झाल्याची चाहूल लागल्याने चोरट्याने घरातून काढता पाय घेतला. यानंतर आम्ही घरातील वस्तूंची पाहणी केली असता ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Seven and a half tolas of gold and cash Theft in Sangamner taluka
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App