Home नांदेड दुर्दैवी! नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी आणखी सात मृत्यू , याला सरकार जबाबदार

दुर्दैवी! नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी आणखी सात मृत्यू , याला सरकार जबाबदार

Nanded: नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील घटनेबाबत आणखी दुर्दैवी बाब समोर आली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करत याबाबत संताप व्यक्त केला.

Seven more deaths in Nanded on the second day, the government is responsible

नांदेड: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी आणखी सात मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे. या सात रुग्णांमध्ये चार बालकांचा समावेश आहे, असं अशोक चव्हाणांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत. पहिल्या दिवशी 24 तर दुसऱ्या दिवशी 7 मृत्यू होतात. याला सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारने या घटनेची जबाबदारी घ्यावी, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

अशोक चव्हाण यांचं ट्विट जसंच्या तसं

नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच… शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात परवा दिवशी 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे या मृतकांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. तसंच एका दिवशी एवढ्या रूग्णांचा मृत्यू होत असेल तर याहून दुर्दैवी ते काय अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने हे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Web Title: Seven more deaths in Nanded on the second day, the government is responsible

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here