Home संगमनेर संगमनेर तालुक्यात वीज कोसळून सात मेंढ्या व एक शेळी जागीच ठार

संगमनेर तालुक्यात वीज कोसळून सात मेंढ्या व एक शेळी जागीच ठार

Lightning Strikes: मेघगर्जनेसह झालेल्या पावसात वीज कोसळून सात मेंढ्या व एक शेळी जागीच ठार (Death).

Seven sheep and one goat were killed on the spot due to lightning Strike

संगमनेर: संगमनेर तालुक्यात आवकाळी पावसाने चांगलेच नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच संगमनेर तालुक्यातील लोहारे शिवारात मेघगर्जनेसह झालेल्या पावसात वीज कोसळून सात मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाली. सोमवारी (दि. 17) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुदैवाने मेंढपाळ बचावला.

लोहारे शिवारात मेंढपाळ रमेश नारायण कानकाटे हे आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन मेंढ्या  चारण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी दोन वाजता पाऊस सुरू झाला. या पावसातच मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली. त्यात सात मेंढ्या व एक शेळी  जागीच ठार झाली.

घटनेची माहिती मिळतात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वीज कोसळून सात मेंढ्या व एक शेळी ठार झाल्याने मेंढपाळ रमेश कानकाटे यांचे मोठे नुकसान झाले. मेंढपाळ कानकाटे यांच्या मृत मेंढ्यांचा पंचनामा करून त्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. विज कोसळून सात मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाल्याच्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Seven sheep and one goat were killed on the spot due to lightning Strike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here