Home क्राईम शिक्षिकेने दिली विद्यार्थ्याला शरीरसुखाची ऑफर, मास्तरांवर हात उचलला तरच….

शिक्षिकेने दिली विद्यार्थ्याला शरीरसुखाची ऑफर, मास्तरांवर हात उचलला तरच….

Thane Crime: शासनाच्या बालगृहातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 40 वर्षीय शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला शारीरिकसुखाची (abused) ऑफर दिल्याचे समोर आले आहे.

Sexual abused of the victim by the teacher who lured her to give you body pleasure

ठाणे : भिवंडीतील शासनाच्या बालगृहातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालसुधार गृहातील एका 40 वर्षीय शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला शारीरिकसुखाची ऑफर दिल्याचे समोर आले. खळबळजनक बाब म्हणजे  आधी तू मुलांना भडकव, मास्तरांवर हात उचलला तरच मी तुला शरीरसुख देईन असे आमिष त्या  शिक्षिकेने दाखवून पीडित मुलाचे लैगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी शहरातील कचेरीपाडा भागात राज्य शासनाच्या वतीने बालसुधारगृह असून हे बालसुधार गृह  भिवंडीतील एका संस्थेमार्फत  चालवण्यात  येते. विशेष म्हणजे  या  बालसुधारगृहात असलेल्या  मुलांच्या  देखभालीसह   शिक्षणासाठी  अनुदानित  संस्था  कार्यरत  आहे.  याच   संस्थेच्या वतीने येथील अल्पवयीन   मुलांच्या   शिक्षणासाठी  काही  शिक्षकांची  नेमणूक  करण्यात  आली.   मात्र   या  बालसुधार  गृहात  गेल्या   काही  वर्षांपासून  कार्यरत  असणाऱ्या  एका चाळीस वर्षीय शिक्षिकेने   येथील काही मुलांचे लैगिक शोषण केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलांकडून यासंदर्भातील तक्रारी बाल न्यायालयात  केल्या जात  होत्या.

त्यातच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेने संस्था संचालक आणि बालसुधारगृहाच्या उपाधीक्षकाच्या विरोधात आठ महिन्यापूर्वी व्हिडीओमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून विनयभंग केल्याची तक्रार केल्याचं समोर आलं आहे. शिवाय जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केल्याचीही तक्रार केली. त्यानंतर सदर  शिक्षिकेला  निलंबित केले. शिवाय   बाल  न्यायालयीन  आदेशानुसार  संबंधित  प्रकरणाची  जिल्हा  महिला  बाल  विकास  समितीच्या अध्यक्षा आणि सदस्यांकडून  चौकशी  सुरु  असतानाच, बालसुधारगृहातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला 17 आणि 28 सप्टेंबर रोजी शरीर सुखाची ऑफर सदर शिक्षिकेने दिल्याचे चौकशीतून समोर आले.

दरम्यान, पीडित मुलांसह आणखी दोन मुलांची  चौकशी  सुरू केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून आलेल्या   माहितीच्या  आधारे संरक्षण अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक प्रकाश दाजी गुडे (वय, 39) यांच्या  तक्रारीवरून त्या  शिक्षिकेवर 21 मार्च 2023 रोजी शांतीनगर  पोलीस  ठाण्यात  पोक्सो  कायद्या  अंतर्गत  गुन्हा  दाखल  केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sexual abused of the victim by the teacher who lured her to give you body pleasure

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here