Home अहमदनगर अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपातासाठी मारहाण

अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपातासाठी मारहाण

Ahmednagar Crime:  ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार (Sexually abused) श्रीरामपुरातील घटना : टाकळीभान येथील आरोपी.

Sexually abused by luring marriage, beating for abortion

श्रीरामपूर | Shrirampur:  ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. तसेच गर्भपातासाठी तरुणीला त्याने मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अत्याचाराचा तसेच अॅट्रॉसिटीचा फसवणूक केली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमेश्वर आसाराम आरगडे असे आरोपीचे नाव आहे. तो तालुक्यातील टाकळीभान येथील आहे. आरगडे हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याने आपण अविवाहित असल्याचे सांगत तरुणीची तिला लग्नाचे आमिष दाखविले. वेळोवेळी तिच्या घरी जाऊन अत्याचार केला. तरुणी गर्भवती राहिल्याने आरगडे याने तिच्यावर  गर्भपातासाठी दबाव आणला. आरोपी आपल्याला शिवीगाळ व मारहाण करत असे, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

आरगडे याच्या छळाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. टाकळीभान येथेही पोलिसांनी आरगडे याचा शोध घेतला.

Web Title: Sexually abused by luring marriage, beating for abortion

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here