शिर्डी – अखेर निळवंडे धरणाला तांत्रिक मान्यता
शिर्डी – अखेर निळवंडे धरणाला तांत्रिक मान्यता
उत्तर नगर जिल्ह्याच्या वरदान ठरलेल्या निळवंडे धरण प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून केंद्रसरकारच्या योजनेच्या निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निळवंडे प्रकल्पाला केंद्र सरकारनी जलायोगाच्या तांत्रिक समितीची म्हणजे टी. एस. इ. मान्यता मिळाली आहे. नाबार्ड आणि केंद्रशासनाच्या निधी मधून प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्री यांनी प्रकल्प लवकर पूर्ण केला जाईल असे प्रतिपादन केले आहे असे खा. सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.
आजपर्यंत जलायोगाच्या सर्व मान्यता घेण्यात आल्या होत्या शेवटची तांत्रिक मान्यता टी. एस. इ. घेणं आवश्यक होत ती मान्यता आता मिळाली आहे. तसेच केंद्र सरकारने निळवंडे प्रकल्पाचा विशेष प्रकल्प योजनेमध्ये समावेश केलाय. शिवसेनचे शिर्डी मतदार संघाचे लोकनेते खासदार सदाशिव लोखंडे आणि स्थानिक पदाधिकार्यांनी पाठपुरावा केल्यानेच काम मार्गी लागले असल्याचे निळवंडे पाठ समितीच्या वतीने सांगण्यात आलय या पार्श्वभूमीवर निळवंडे पाठपुरावा समितीच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच त्यांचे आभार मानले
याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की, गेल्या ४३ वर्षापासून प्रकल्पाला मान्यता मिळाली असून केंद्रशासनाची कुठलीही परवानगी राज्य शासनाने घेतली नव्हती त्यामुळे केंद्राच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे आता या निर्णयामुळे निधी केंद्राकडून मिळणार असून अन्य निधी नाभार्ड अथवा जागतिक बँकेकडून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून असे खा. लोखंडे यांनी सांगितले याचबरोबर हा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केला असून यात कुणी श्रेय घेऊ नये असे खा. लोखंडे यांनी सांगितले.
संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
पहा: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL Scam