Home Accident News संगमनेर: शिवशाही बसची दुचाकीला धडक, एक ठार एक जखमी

संगमनेर: शिवशाही बसची दुचाकीला धडक, एक ठार एक जखमी

Sangamner Accident: १९ मैल परीसरात दुचाकीस्वाराला बसने दिलेल्या धडकेत १ ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना.

Shivshahi bus Accident collides with a two-wheeler, one killed and one injured

संगमनेर:  तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावा अंतर्गत असणाऱ्या १९ मैल परीसरात दुचाकीस्वाराला बसने दिलेल्या धडकेत १ ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि ९ डिसेंबर रोजी सकाळी ९.५० श वाजेच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात सचिन चंद्रभान ढेंबरे (वय ३६) हा ठार झाला असून राहुल चंद्रभान ढेंबरे हा जखमी झाला आहे. हे दोघे भाऊ साकूर जवळील बिरेवाडी येथील रहिवासी आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाकण येथून नाशिक – पुणे महामार्गाने राहूल चंद्रभान ढेंबरे व सचिन चंद्रभान ढेंबरे हे दोघे जण दुचाकी (क्रमांक एम एच १४ बी जी ४९२७) हिच्या वरुन संगमनेर तालुक्यातील निमगांवजाळी येथे लग्नासाठी जात होते. सचिन व राहूल हे दोघे शुक्रवारी सकाळी १९ मैल परीसरात आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या शिवशाही (बस क्र एम एच १४ जी व्हि ००८१) हिचा दुचाकीला जोरदार धक्का बसला.  त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. या अपघातात सचिनचा मृत्यू झाला तर राहूल हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी जखमी व मयत यांना खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील मेडिकेव्हर या पाठविण्यात आले. जखमी राहूलवर उपचार सुरू आहेत.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

दरम्यान, भरधाव वेगात असलेला बस चालक इरफान गुलाब शेख रा. पिंपरी भाऊसाहेब नगर, ता. निफाड जि. नाशिक हा त्याच्या ताब्यातील बस तिथेच न थांबवता सरळ पुढे निघून गेला. याबाबत नागरिकांनी महामार्ग पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने दखल घेत सदरची बस हिवरगाव पावसा टोलनाका परीसरात पकडून बस चालकाला घारगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Shivshahi bus Accident collides with a two-wheeler, one killed and one injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here