प्रवाशांनी भरलेल्या शिवशाही बसने अचानक घेतला पेट, काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी
Nashik Shivshahi Bus Burnt: काही मिनिटांतच संपूर्ण बसने पेट (Fire) घेतला. बघातच क्षणी संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी.
नाशिक : नाशिकमध्ये निफाड येथे मोठा अपघात झाला आहे. नाशिकमध्ये एका धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने सर्वानांच धक्का बसला. प्रवासी खाली उतरताच काही मिनिटांतच संपूर्ण बसने पेट घेतला. बघातच क्षणी संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमध्ये 25 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा येथे धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याची कळताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
Web Title: Shivshahi bus full of passengers caught fire suddenly
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App