Home बीड उसतोडणी करताना शेतात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

उसतोडणी करताना शेतात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

human skeletons were found: विखुरलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ, चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीचा हा सांगाडा असल्याचे निष्पन्न झाले.

shock as human skeletons were found in the field during harvesting in Bleed

माजलगाव (बीड) : तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विखुरलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीचा हा सांगाडा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आबासाहेब चाळक यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. दरम्यान आज सकाळी मजुरांना उसाच्या पाचोटात मानवी कवटी निदर्शनास आली. घाबरलेल्या मजुरांनी सदरील बाब शेतमालकाला सांगितली. याची खबर पोलिसांना देण्यात आली. तात्काळ दाखल होत पोलिसांनी तिथे पाहणी करत इतर अवयव शोधून काढली. त्याचबरोबर कपडे आणि चप्पलही सापडली.

दरम्यान, पोलिसांना 25 ऑगस्ट 2022 रोजी राधाकिसन बाबुराव जगदाळे ( 63, रा. हरकीलिमगाव) या बेपत्ता व्यक्तीशी साम्य आढळून आले. पोलिसांनी जगधने यांच्या नातेवाईकांना बोलावून सांगाडा, कपडे, चप्पल दाखवले. यावरून सांगाडा राधाकिसन बाबुराव जगदाळे यांचा असल्याचे त्यांचा मुलगा तुळशीराम राधाकिसन जगदाळे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी सांगाडा अंबाजोगाईतील शासकीय इस्पितळात रवाना केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाते, पोलीस शिपाई विलास खराडे करत आहेत.

Web Title: shock as human skeletons were found in the field during harvesting in Bleed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here