Home नाशिक निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; ट्विट करत दिली माहिती

निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; ट्विट करत दिली माहिती

Nashik Accident News: सत्यजीत तांबेंना (Satyajeet Tambe) मोठा धक्का, जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन.

Shocked Satyajeet Tambe before the Election result

नाशिक: पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. दरम्यान, निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे.

माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात ((Accident) ) झाला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: Shocked Satyajeet Tambe before the Election result

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here