Home अहमदनगर शिर्डीत गोळीबार करणारा अटकेत, गावठी कट्टा हस्तगत

शिर्डीत गोळीबार करणारा अटकेत, गावठी कट्टा हस्तगत

Breaking News | Ahmednagar: शिर्डी गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर व नाशिक जिल्ह्यात शोध घेऊन सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात आला आहे.

Shooter arrested in Shirdi, Gavathi Katta captured

नगर : शिर्डी गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर व नाशिक जिल्ह्यात शोध घेऊन सराईत गुन्हेगार संपत वायकर याला सावळीविहीर येथून जेरबंद केले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला.

संपत शंकर वायकर (वय २० रा. पिंपळवाडी, शिर्डी, ता. राहाता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार जॅक्सन शेख (रा. पिंपळवाडी, शिर्डी, ता. राहाता) हा पसार आहे. शिर्डी शहरामध्ये हॉटेल गणपती पॅलेस येथे फिर्यादी साईनाथ पवार हा त्याच्या भावासह चहा घेत असताना दुचाकीवर आलेल्या संपत वायकर व त्याचा साथीदाराने मागील भांडणाच्या कारणावरून साईनाथ पवार यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गोळीबाराची घटना संवेदनशील असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप चव्हाण, अमृत आढाव व उमाकांत गावडे यांचे पथक नेमून तपासाच्या सूचना दिल्या. गुन्ह्यातील पसार आरोपीचा शिर्डी पसिरात शोध सुरू असताना २२ मार्च २४ रोजी संपत वायकर साथीदारासह विना क्रमांकाच्या मोपेड दुचाकीवर अतिथी हॉटेल, सावळीविहीर फाटा, शिर्डी (ता. राहाता) येथे येणार आहे. पोलिस पथकाने तत्काळ सापळा लावला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच एक जण पळून गेला तर संपत वायकर याला पोलिसांनी ताब्यात घेलले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व मोबाईल हस्तगत केला. पुढील तपासकामी त्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी संपत वायकर सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध शिर्डी, राहाता पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा तयारी, जबरी चोरी व दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Shooter arrested in Shirdi, Gavathi Katta captured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here