Home देव धर्म “मी कमवतोय म्हणुन घरातली माणसं जीवन जगतायेत.” श्री स्वामी समर्थ

“मी कमवतोय म्हणुन घरातली माणसं जीवन जगतायेत.” श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थ   
किती मस्त सांगतात…
कुटुंबप्रमुख पुरुषाला वाटतं की “मी कमवतोय म्हणुन घरातली माणसं जीवन जगतायेत.”
पण खरं तर स्वामी सांगतात की “तसं नाहीए. घरातली माणसं जगावीत या देवाच्या इच्छेमुळे  तुझी कमाई चालु आहे. त्यांना टाकुन दे मग तुझी कमाईच खाली गडगडेल. अधोगती होत जाईल.”
घरच्या बाईला देखिल वाटतं की “मी कामं करते म्हणुन घरातली माणसं जेवतात, धुतलेले कपडे घालतात वगैरे वगैरे.”
पण स्वामी सांगतात की “त्यांच्यासाठीच तुला शक्ती दिलीय. चांगलं आरोग्य दिलंय. त्यांना टाकशील तर राहिल का आरोग्य जागेवर?”
खरंय…
आपल्या घरातल्यांच्या नशीबाची आपल्याला साथ असते म्हणुन आपण प्रगती करत असतो.कमवत असतो.कामे करत असतो. हे त्यांचे आपल्यावरच ऋण असते. पण आपण त्यांच्यावरच उपकार केल्यासारखं फिल करत असतो.
म्हणुन यापुढे असा विचार करायला लागेल की “”घरातल्या माणसांना मी सांभाळत नाहीये, तर घरातल्या माणसांसाठी देवाने  मला आत्तापर्यंत सांभाळलंय.
श्री स्वामी समर्थ जप:

संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेज लाईक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here