Home अहमदनगर ६० वर्षीय महिलेवर अत्याचार करणारा वेटर अटकेत

६० वर्षीय महिलेवर अत्याचार करणारा वेटर अटकेत

Shrigonda ladies molestation  vetar arrested 

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण रोडवरील एका हॉटेलमधील वेटरने शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या वेटरने महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो पसार झाल्याने पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल करताच फरार झालेला हॉटेल मधील वेटर रितेश रमेश म्हस्के यास यास श्रीगोंदा पोलिसांनी नगर येथील रेल्वे स्थानाकावरून ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत अंमलदार संदीप पितळे यांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आरोपीचे लोकेशन मिळवून आरोपी अहमदनगर रेल्वे स्थानक याठिकाणी असल्याचे लाखात आले. पोलिसांनी त्यास तेथून ताब्यात घेतले. अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News

Web Title: Shrigonda ladies molestation  vetar arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here