Home अहमदनगर श्रीगोंद्यात तलवारीने मारहाण, २० जखमी ८ जखमी

श्रीगोंद्यात तलवारीने मारहाण, २० जखमी ८ जखमी

श्रीगोंद्यात तलवारीने मारहाण, २० जखमी ८ जखमी

श्रीगोंदा: जातपंचायतीमधून बाहेर काढलेल्या प्रसंगाची व्हीडीयो शुटींग केल्याच्या कारणावरून बुधवार दि.११ जुलै रोजी सायंकाळी पाच  वाजता एका समाजाच्या बाहेरून आलेल्या व स्थानिक दोनशे ते अडीचशे लोकांच्या जमावाने कारखान्यावरील त्याच्याच परंतु, जातीतून बहिष्कृत केलेल्या वीस ते पंचवीस जणांना जबर मारहाण केली. जखमीमध्ये मुली,महिला  पुरुषांचा समावेश आहे. यातील आठ जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केले आहे.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

याबाबत माहिती अशी, श्रीगोंदा कारखान्यावर बुधवारी एका समाजातील लोकांची जातपंचायत भरली होती. कारखान्यावरील ज्या कुटुंबाना जातीतून बाहेर काढले. त्यातील काही महिला त्यांच्या घरातून हि जात पंचायत पाहत होत्या. तर इज जन जातपंचायत सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन या जातपंचायतीची शुटींग काढत होता. शुटींग केल्याचा राग आल्यामुळे जात पंचायातीमधील लोकांनी त्या मुलाला मारहाण केली. मात्र हे मारहाण करणारे बीड, पुणे जिल्ह्यातील ओझर , धामणगाव येथील होते. तसेच काही स्थानिकांसह जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या कारखान्यावरील या वस्तीवर हल्लाबोल करत तलवार  लोखंडी गज, दगडाने जबर मारहाण केली. येथील काही तरुण कामानिमित्त बाहेर गेल्याने घरी असलेल्या पंचवीस ते तीस महिला पुरुष व मुलांना जबर मारहाण केली.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

या मारहाणीत अनेकांच्या हाताला पायाला डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here