Home श्रीरामपूर अहमदनगर: शेतकऱ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर: शेतकऱ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Shrirampur Farmer dies drown in well

Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात रात्रीच्या सुमारास विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा पाईप फिरवताना तोल जाऊन  विहीरीत पडून एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

माणिक भास्कर मुठे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात विहीरीवर वीजपंप सुरू करण्यापूर्वी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माणिक मुठे व रविंद्र मुठे गेले होते.

लाईट येण्यास पाच-दहा मिनिटांचा अवधी असल्याने पाईप खालील केबल वर घेण्यासाठी विहिरीच्या कठड्यावरील पाईप व केबल ओढताना तोल जाऊन माणिक पाण्याने भरलेल्या विहीरीत पडला.

पाण्याचा आवाज ऐकून रविंद्रने विहीरीकडे धाव घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने रविंद्रने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र बाजुचे लोक मदतीला येईपर्यंत माणिक पाण्यात बुडाला होता.

स्थानिक तरुणांनी मुठे यांना बाहेर काढुन तातडीने येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र  उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Web Title: Shrirampur Farmer dies to drown in well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here