Home अहमदनगर धक्कादायक: चक्क महिलांनीच विवाहित महिलेस विकले

धक्कादायक: चक्क महिलांनीच विवाहित महिलेस विकले

Shrirampur women sold to married women

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील दोन महिलांनी एका विवाहित महिलेस विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालेगाव येथील एका विवाहित महिलेस केटरिंगच्या कामासाठी बोलावून त्या महिलेला इंदोर येथे १ लाख २० हजार रुपयांना विकल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मोतीनगर येथील एका तरुणाने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून अनिता रवींद्र कदम रा. आंबेडकर वसाहत दत्तनगर ता. श्रीरामपूर व तिची मैत्रीण संगीता( संपूर्ण नाव माहित नाही) या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार माझ्या पत्नीला केटरिंगच्या कामासाठी आमच्याकडे येऊ द्या. यासाठी तिला आमिष दाखवून आणण्यात आले. त्यानंतर अनिता व संगीता यांनी मध्यप्रदेश येथील इंदोर येथे नेऊन अज्ञात इसमाकडून १ लाख २० हजार रुपये घेत तिला त्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आले . या घटनेने परिसरात खळबळ उडाली. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Shrirampur women sold to married women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here