Home नाशिक सिडकोत महिलेवर बलात्कार, दोघींचा विनयभंग

सिडकोत महिलेवर बलात्कार, दोघींचा विनयभंग

Breaking News | Nashik Crime: एकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला, तर वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनांमध्ये दोन जणींचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर.

Sidkot woman raped, both molested

नाशिक : सिडको परिसरात एकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला, तर वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनांमध्ये दोन जणींचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्नात आले आहेत.

सिडकोतील उत्तमनगर भागात राहणाऱ्या पीडितेची नितीन सुकदेव गवते (स. वाडीवडे, ता. इगतपुरी) याच्याशी सन २०२० मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला वेगवेगळ्या भागात घेऊन जात बलात्कार केला. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ दरम्यान सुरू होता. सलग तीन वर्षे संशयिताकडून अत्याचार होत असल्याने युवतीने लग्नाचा तगादा लावला असत्ता, संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला असून, उपनिरीक्षक उंडे तपास करीत आहेत,

विनयभंगाचा पहिला प्रकार कामटवाडा भागात घडला. अक्षय खखैरनार (वय २४, रा. उंबरखेड रोड, पिंपळगाव ब.) या युवकाने सोमवारी (दि. १) रस्त्याने जाणाऱ्या पीडित तरुणीची चाट अडवीत तिचा विनयभंग केला. मयूर हॉस्पिटलसमोर हा प्रकार घडला. संशयिताने पीडितेस शिवीगाळ व दमदाटी करीत हे कृत्य केले. याप्रकरणी पोलीस नाईक टिळेकर तपास करीत आहेत. दुसरा प्रकार अश्विननगर भागात घडला. अमोल जनार्दन मानकर गा संशयिताने बुधवारी (दि. ३) रस्त्याने पायी जाणाऱ्या पीडितेची वाट अडवीत अज्ञात कारणातून महिलेस शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी जमादार शेख तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वडझिरे (ता. सिन्नर) येथे घेऊन जात एका परिचिताने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि. १) हा प्रकार घडला. याप्रकरणी गणेश गिते नामक युवकाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून हे कृत्य केले. याप्रकरणी सहाराक निरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Web Title: Sidkot woman raped, both molested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here