Home क्राईम धक्कादायक: बहिणीने आत्महत्या केल्यावर, पत्नीचा कुऱ्हाडीने खून, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक: बहिणीने आत्महत्या केल्यावर, पत्नीचा कुऱ्हाडीने खून, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Sister commits suicide husband Murder wife with ax

शिरूर | Murder Case: कौटुंबिक वादातून बहिणीने आत्महत्या केल्याने संतप्त पतीने यासाठी पत्नीस जबाबदार धरत तिचा कुऱ्हाडीने घाव घालत खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली. तसेच स्वत विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

समीर तावरे असे खून करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत पत्नी वैशाली तावरे आणि बहीण माया सातव यांचा मृत्यू झाला आहे.  

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर तवरे यांची बहीण माया व पत्नी वैशाली यांच्यात बुधवारी रात्री कौटुंबिक वाद झाला होता. बहीण माया सातव यांनी टोकाचे पाऊल उचलत घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली.

याबाबतची माहिती भाऊ समीर याला कळताच समीर आणि पत्नी वैशाली यांच्यात सकाळी भांडण झाले. या वादातून समीर याने वैशाली हिला जबाबदार धरत तीच्यावर कुऱ्हाडीने मानेवर घाव घालून तिचा खून (Murder) केला.  त्यानंतर स्वतः समीर याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

समीरची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास शिरुर पोलिस करीत आहेत.

Web Title: Sister commits suicide husband Murder wife with ax

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here