पिचडांचे खंदे समर्थक सिताराम गायकर यांच्यासह दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

  Sitaram Gaikar a staunch supporter of Pichad have joined the NCP

  अकोले | मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम गायकर(Sitaram Gaikar) यांच्या सह अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

  विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी आम्ही माणसे आहोत. फुट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या हिताच काय? तुमच्या भावी पिढीच्या भवितव्याच काय याचा विचार करा. आता इकडे तिकडे जायचे नाही असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

  अकोले तालुक्यातील पिचड समर्थक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार म्हणाले की, घटना घडत असतात कोणी जात असत कोणी येत असतात. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळाली हिती. प्रदेशाध्यक्ष पद पवार साहेबांनी दिले होते. आदिवासी प्रदेशाध्यक्ष पद त्यांना दिले तसेच अनेकानांही साहेबांनी पदे दिली. वैभव पिचड यांना त्यावेळी खूप समजाविण्याचा प्रयत्न केला होता. तुमच भवितव्य आहे मात्र काय झाल माहित नाही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचा आमदार यावा म्हणून प्रयत्न केला. राष्ट्रवादीचा आमदार मिळाला. आता एकोप्याने पुढे जायचे आहे. दुजाभाव करायचा नाही. सगळ्यांना घेऊन बरोबर जायचे आहे. सत्ता चालविताना अनुभवी लोक लागतात असेही अजित पवार म्हणाले.

   Web Title: Sitaram Gaikar a staunch supporter of Pichad have joined the NCP

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here