Home अहमदनगर अहमदनगर: दोन केंद्रप्रमुखांसह सहा शिक्षक निलंबित

अहमदनगर: दोन केंद्रप्रमुखांसह सहा शिक्षक निलंबित

Ahmednagar News:  मुलींची छेडछाड, डमी शिक्षक प्रकरण दोन केंद्रप्रमुखांसह सहा प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची (Suspended) कारवाई.

Six teachers suspended including two center heads

अहमदनगर : शाळेत स्वतः उपस्थित न राहता डमी शिक्षक ठेवणे, तसेच शाळेतील मुलींची छेड काढणे, अशा गंभीर वर्तवणुकीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोन केंद्रप्रमुखांसह सहा प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शाळेत शिक्षक बाजीराव शंकर पानमंद यांनी स्वत: अध्यापन करण्याऐवजी परस्पर खासगी बेरोजगार डीएड शिक्षकांची नेमणूक केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत समोर आले होते. त्यामुळे पानमंद यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांचे मुख्यालय आता अकोले करण्यात आले आहे. याशिवाय पारनेर पंचायत समितीमधील केंद्रप्रमुख अविनाश गुलाब गांगर्डे यांच्यावरही हाच ठपका ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनाही अकोले मुख्यालय देण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील कारेगाव येथील जि. प. शाळेत रमेश शिवाजी आहेर या शिक्षकानेही बेरोजगार शिक्षकाची परस्पर नेमणूक करत त्याच्याकडून अध्यापन करून घेतले. याबाबत थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्यानंतर त्यांनाही निलंबित करण्यात आले असून, जामखेड हे मुख्यालय देण्यात आले आहे.

राहुरी तालुक्यातील निंभेरे शाळेत मुलींच्या छेडछाड प्रकरणी शिक्षक मदन दिवे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे दिवे यांना निलंबित करण्यात आले असून, जामखेड मुख्यालय देण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील शिक्षक पोपट फाफाळे यांनीही वर्गातील मुलींची छेड काढली होती.  फाफाळे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांचे मुख्यालय अकोले करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील केंद्रप्रमुख प्रभाकर रोकडे यांनी पर्यवेक्षीय कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांना निलंबित आले असून, त्यांना जामखेड मुख्यालय देण्यात आले आहे.

Web Title: Six teachers suspended including two center heads

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here