Home क्राईम संगमनेर: चक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक

संगमनेर: चक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक

Sangamner Crime:  तस्काराच्या गाडीला अपघात झाल्याने प्रकरण उघडकीस. दोघांना अटक (Arrested).

Smuggling beef in Maruti Swift car, two arrested

संगमनेर: मारुती स्विफ्ट कार मरून गोवंश मांसाची विक्री करण्यासाठी जाणाऱ्या तस्कराच्या गाडीला अपघात (Accident) झाल्याने ही तस्करी उघड झाली असून संगमनेर तालुका पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे तर एकजण पसार आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एका स्विफ्ट कार सह ४०० किलो गोमांस जप्त केले आहे

मुन्ना असलम सय्यद (वय २४ वार्ड नंबर २ ता. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) सलमान इंस्फान शेख (वय २४ रा. वार्ड नंबर २ श्रीरामपूर हल्ली कुरण, ता. संगमनेर) एजाज कुरेशी (रा. वार्ड नंबर २ ता श्रीरामपुर, जिल्हा अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निमोण शिवारात लोणी ते नांदूरशिंगोटे रोडवर ऐश्वर्या हॉटेल सध्या बंद अवस्थेत असलेल्या ठिकाणी स्विफ्ट कार नंबर एम एच 15 सीएम 36 88 मधून गोवंश मास विक्रीसाठी वाहतूक करीत असताना रात्रीच्या वेळी एका ट्रॅक्टरशी या गाडीची धडक झाल्याने या स्विफ्ट कार मधून गोवंश मांस वाहतूक होत असल्याचे उघड झाले. संगमनेर तालुका पोलीस त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांनी गाडीसह मांस जप्त केले व दोघांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

संगमनेर तालुका पोलिसांना या ठिकाणी ४०० किलो गोमांस या गाडीतून जप्त केले. त्यावेळी मुन्ना आणि सलमान हे दोन आरोपी गाडीमध्ये आढळून आले. या दोघानाही पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Smuggling beef in Maruti Swift car, two arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here