Home क्राईम प्रेयसीविषयी अपशब्द वापरला म्हणून मुलाने केला बापाचा खून

प्रेयसीविषयी अपशब्द वापरला म्हणून मुलाने केला बापाचा खून

Pune Crime: प्रेयसीविषयी वडिलांनी अपशब्द वापरत शिवी दिली, याचा राग मनात धरून दोरीने गळा आवळून मुलाने वडिलांचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या (Suicide) भासवण्याचा प्रयत्न.

Son Murder father for using bad language about girlfriend

पिंपरी: प्रेयसीविषयी वडिलांनी अपशब्द वापरत शिवी दिली, याचा राग मनात धरून दोरीने गळा आवळून मुलाने वडिलांचा खून केला. तर, मुलाच्या आईने आणि मोठ्या भावाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. ५) सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव अशोक रामदास जाधव (वय ४५) असे आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक काशीनाथ खंडाळे यांनी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मृताची पत्नी हिच्या विरोधात गुन्हा दाखल करत मुलगा राहुल अशोक जाधव (वय २५), अनिल अशोक जाधव (वय २३) यांना अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की,  आरोपी अनिल याचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीविषयी त्याचे वडील मयत अशोक जाधव यांनी वाईट शब्द उच्चारले. याचा राग मनात धरून घरातील दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला. खून करताना अशोक यांच्या नाकातोंडातून फरशीवर रक्त पडले. रक्ताचे डाग महिला आरोपीने अशोक यांच्या अंगातील शटनि पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर आरोपी राहुल याने घराचे दोरी फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा बनाव रचला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Son Murder father for using bad language about girlfriend

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here