Home क्राईम Murder Case धक्कादायक: मुलानेच केला वडिलांचा खून

Murder Case धक्कादायक: मुलानेच केला वडिलांचा खून

Son Murder father in Rahuri Taluka

राहुरी | Murder Case: दारू पिऊन येत पत्नीसोबत भांडण करणाऱ्या मुलाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या बापाला बेदम मारहाण करीत जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे घडली.

याप्रकरणी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे वय ४५ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर हा नेहमीच दारू पिऊन पत्नीशी वाद घालत असे. बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पत्नी सुनीता यांच्याशी ज्ञानेश्वर हा दुध काढण्याच्या कारणावरून वाद घालत होता. या दोघांत सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी वडील विठ्ठल हारदे वय ७२ यांनी पत्नीशी वाद घालू नकोस असे सांगितल्याचा राग आल्याने ज्ञानेश्वर याने वडिलांना मारहाण केली. यामध्ये वडील अस्थवस्त होऊन जमिनीवर पडले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ज्ञानेश्वर यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नीरज बोकील हे करीत आहे.

Web Title: Son Murder father in Rahuri Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here