Home महाराष्ट्र पोटच्या मुलाचा आईनेच पाच लाखांची सुपारी देऊन केला खून

पोटच्या मुलाचा आईनेच पाच लाखांची सुपारी देऊन केला खून

Yavatmal Crime: मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळलेल्या एका आईने आपल्या मुलाची पाच लाख रुपयांची खंडणी देऊन खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना.

son was Murder by the mother by paying five lakh betel nuts

यवतमाळ: व्यसनाधीन असलेल्या मुलाला त्यापासून परावृत करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने  मुलाचा अखेर आईनेच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे उघडकीस आली आहे. ही खळबळजनक घटना चौसाळा जंगल परिसरात घडली. या प्रकरणी दोन महिला सह चार जणांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश विजय देशमुख (वय २५) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी आई वंदना देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी ‌त्याचा मुलगा लखन चौधरी यांना तर सुपारी घेऊन हत्या करणारे विकी भगत आणि राहुल पठाडे यांना या प्रकरणी लोहारा पोलिसांनी अटक केली आहे.

योगेश देशमुख याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो त्याच्या आईचा छळ करत होता. त्याला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, तरी सुद्धा तो त्यांच्या आईला खूप त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून आपल्या नतेवाईकांसोबत कट रचून आईनेच पाच लाख रुपये देऊन आपल्या मुलाची हत्या केली. खून करण्यासाठी आरोपींना तिने २ हजार रुपये अॅडव्हान्स दिले.

यानंतर आरोपींनी योगेश याला चौसाळा जंगल परिसरात नेऊन योगेशचा गळा आवळून खून केला. गळा अवळूनही त्याचा मृत्यू होत नसल्याने त्याच्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह त्यांनी तसाच जंगलात सोडून दिला. तब्बल १२ दिवस त्याचा मृतदेह जंगलात पडून कुजला होता. दरम्यान, आरोपींना पैसे न मिळाल्याने त्यांनीच पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर फोन करून याची माहिती दिली.

दरम्यान, लोहारा पोलिस यांनी या फोनची पडताळणी करण्यासाठी घटनास्थळी गेले योगेशचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. दोघा आरोपींना त्यांनी अटक करून थेट आरोपी आई पर्यंत पोलिस पोहचले. या बाबत आईची चौकशी केल्यावर आईने सुपारी देऊन खून केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: son was Murder by the mother by paying five lakh betel nuts

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here