Home अहमदनगर बापाला घरी बसा असं म्हणणारा मुलगा जन्मालाच यायला नको- जितेंद्र आव्हाड

बापाला घरी बसा असं म्हणणारा मुलगा जन्मालाच यायला नको- जितेंद्र आव्हाड

Breaking News Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता वयावरून टीका केली त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

son who tells his father to stay at home should never be born

अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर वयावरून निशाणा साधला होता. सरकारमधील कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्ष निवृत्त होतात, पण 84 वय झालं तरी तुम्ही थांबेना, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाल होते. अजित पवारांचा रोख हा पूर्णपणे शरद पवारांवरच होता. कल्याणमधील मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी टीका केली होती. अजित पवारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बापाला जो पर्यंत चालता ‌येत तो पर्यंत चालू द्यायला हवं. बापाला घरी बसा अस म्हणाणारा मुलगा जन्मालाच यायला नको. ज्यांनी मोठं केलं त्यांनाच तुम्ही म्हणतात घरी बसा. माय बाप हे घरातील ऊर्जास्त्रोत असतं, आई-बापाविना घरं रिकामं वाटायला लागतं. महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लागलीय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार

वय झाल्यावर थांबायचंं ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. पण काहीजण हट्टीपण करतात, ऐकायला तयार नाहीत. सरकारमधील कर्मचारीसुद्धा 58 व्या वर्षी निवृत्त होता. काहीजण 65, 70 आणि 75 व्या वर्षी निवृत्त होतात पण 84 वय झालं तरी तुम्ही थांबेना. अरे काय चाललंय आम्ही आहोत ना काम करायला. कुठं चुकलो सांगा, आमच्यात तेवढी धमक आणि ताकद असून पाच सहा वेळा उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Web Title: son who tells his father to stay at home should never be born

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here