स्पा सेंटर; मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय- Prostitution Business
Prostitution Business: स्पा सेंटर; मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, मॅनेजरला अटक.
पुणे: वानवडी येथील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. या प्रकरणी मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
अंकुश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३६७/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील केदारी पेट्रोल पंपासमोरील इमारतीत व्हि आय पी फॅमिली स्पा सेंटर आहे.. या ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा घातला. तेव्हा चार तरुणींकडून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले. या घटनेने खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवले हे करीत आहेत.
Web Title: Spa Center Prostitution Business in the name of massage