Home महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन, वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन, वेळापत्रक जाहीर

SSC HSC Exam time table 2022 Today

मुंबई | SSC HSC Exam time table 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून परीक्षांच्या वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत पार पडेल. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडेल. याशिवाय, बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पार पडतील. तर दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत पार पडतील

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील. तसे परीक्षेचे स्वरुप आणि मूल्यमापनाची पद्धत पूर्वीप्रमाणेच असेल. परीक्षेदरम्यान शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

SSC HSC Exam time table 2022

SSC Exam time table 2022

Web Title: SSC HSC Exam time table 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here