Home संपादकीय दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण: हंगेवाडीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला...

दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण: हंगेवाडीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार

Ahmednagar: हंगेवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार.

State Level Award to Netaji Subhash Chandra Bose Rural Non-Agricultural

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. १९ सप्टेंबर २०२२ रोजी गणपतीपुळे येथे १२.३० वाजता उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री अतुल सावे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे महामंत्री उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कराचे वितरण करण्यात आले आहे. काका कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी चेअरमन शिवाजीराव भोसले, व्हाईस चेअरमन प्रतिक गणपतराव सांगळे, संचालक देवराम सदाशिव घुगे, संचालक प्रमोद सतीश बोंद्रे, संचालक सौ. शारदा अण्णासाहेब नागरे, संचालक भिमराज गंगाधर केकान, संचालक देवराम पांडुरंग गायकवाड तसेच संचालक व व्यवस्थापक सोमनाथ वाघ हे उपस्थित होते.

नेताजी सुभाष चंद्र बोस पतसंस्थेचे संस्थापक व अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक, सहकार महर्षीं भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपतराव पुंजाजी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेने सहकारात आदर्शवत कार्य केले आहे. अल्पवधीत सर्वसामान्यचा विश्वास संपादन केला आहे. पतसंस्थेने सभासदांकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुविधा देण्यावर भर दिला आहे. तसेच सामाजिक कार्यातही पतसंस्था अग्रेसर आहे. आरोग्यशिबिर, नेत्ररोग शिबीर, रोटरी आय केअर यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर, महिला स्वयंसहायता बचतगट रोजगारासाठी महिला मेळावे, महिला व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. १० कोटी ते २० कोटी ठेवी असलेल्या गटात नेताजी सुभाष चंद्र बोस पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे.

पतसंस्थेच्या प्रगतीच्या आलेखात संस्थापक चेअरमन गणपतराव पुंजाजी सांगळे, संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर, संचालक अहमदनगर जिल्हा सहकारी बँक यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन शिवाजी भोसले, व्हा. चेअरमन प्रतिकराव सांगळे, संचालक व व्यवस्थापक सोमनाथ वाघ, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

पतसंस्थेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, राजहंस दुधचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, इंद्रजित थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.

Web Title: State Level Award to Netaji Subhash Chandra Bose Rural Non-Agricultural

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here