सावत्र भावाचा गतिमंद बहिणीवर अत्याचार
गतिमंद अल्पवयीन सावत्र बहिणीला निरीक्षण गृहातून घरी नेऊन तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याची घटना उघडकीस.
हिंगोली: सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे गतिमंद अल्पवयीन सावत्र बहिणीला निरीक्षण गृहातून घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (२६ जुलै) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ब्राह्मणवाडा येथील एक तरुण हिंगोलीच्या एका निरीक्षणगृहात आला. त्याने आई, वडील आजारी असल्याने सावत्र बहिणीला नेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने बहिणीला गावाकडे नेले. त्या ठिकाणी २६ जून रोजी घरी कोणीही नसताना तिच्यावर अत्याचार केला. ती रडत असताना तिला मारहाण केली. तसेच हा प्रकार निरीक्षण गृहातील कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने अल्पवयीन सावत्र बहिणीला पुन्हा निरीक्षणगृहात आणून सोडले. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी एक मुलगा तिला गावी नेण्यासाठी आला. मात्र या वेळी त्या मुलीने जाण्यास नकार देऊन घरी गेल्यानंतर मला त्रास दिला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे निरीक्षणगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुलीस पाठवले नाही.
दरम्यान, त्या मुलीला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विश्वासात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिला कशा प्रकारचा त्रास दिला जातो अशी विचारणा केली असता तिने सर्व घटना कथन केली. पोलिस उपअधीक्षक प्रशांत देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर, उपनिरीक्षक आघाव अधिक तपास करीत आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.
Web Title: Stepbrother’s Rape of dynamic sister
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App