Home अहमदनगर अहमदनगर: १० वीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या- Suicide

अहमदनगर: १० वीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या- Suicide

Student commits suicide by getting less than 10 marks

कर्जत | Karjat: जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील मयूर महादेव हजारे या विद्यार्थ्याने १० वीत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. कर्जत येथे तो शिकत होता. या घटनेने कर्जत व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव हजारे हे तालुक्यातील देवदैठण  येथील रहिवासी असून ते कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयुर (अर्थव) हजारे हा कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता शुक्रवारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात मयुर यास 60 टक्केच गुण मिळाले.

यामुळे त्यास नैराश्य आले व घरात कोणी नसतांना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यावर देवदैठण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Student commits suicide by getting less than 10 marks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here