धक्कादायक: परीक्षेच्या आदल्या दिवशी तरुणीने उचललं टोकाचं पाऊल- Suicide
Aurangabad Suicide Case: परीक्षेचा अभ्यास करीत होती मात्र अचानक तिने आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
औरंगाबाद: NEET परीक्षा एका दिवसावर असताना एका विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी नगरमध्ये ही घटना घडली. शनिवारी ही घटना घडली. ऋतुजा गणेश शिंदे असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा शिंदे ही विद्यार्थीनी NEET परीक्षेचा अभ्यास करत होती. ऋतुजाला बारावी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र पहिल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ऋतुजाने पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी केली.
दरम्यान परीक्षा एका दिवसावर आली असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऋतुजाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ऋतुजाने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समोर आले नाही. मात्र, परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. ऋतुजा अभ्यासात प्रचंड हुशार होती. तसेच तिचा स्वभावही मनमिळावू होता. तिने टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: Student committed suicide by hanging himself before Exam