Home पुणे Suicide: कारागृहातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: कारागृहातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Suicide News:  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा आवळून केला होता खून.

Suicide by hanging of a prison inmate

Pune | पुणे: येरवडा कारागृहातील एका कैद्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कैद्याने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी कारागृहात होता.

सचिन मधुकर नरवाडे (वय ३१, रा. तांबे बिल्डींग, बजरंगवाडी, शिक्रापूर, मूळ रा. सावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, २ जून रोजी शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडीत सचिनने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केला होता. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सचिनला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सचिनची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

गुरुवारी दि. ७ जुलै दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयीन बंद्यांना मोकळे सोडण्यात आले होते. अर्ध्या तासानंतर कैद्यांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी सचिन आढळून आले नाही. सचिनने बराक क्रमांक दोनच्या परिसरातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

सचिनने चादर झाडाला बांधून आत्महत्या केल्याचे आढळून आले, असे येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी माहिती दिली आहे.

Web Title: Suicide by hanging of a prison inmate 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here