Home संगमनेर संगमनेर: विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner News: विवाहितेने शेतातील झाडाला साडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना.

Suicide by hanging the married woman

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागातील खंडेरायवाडी येथे विवाहितेने शेतातील झाडाला साडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. उज्वला मंगेश खंडागळे (२४) असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  साहेबराव वचन मेंगाळ हे अकलापूर येथील रहिवाशी असून सध्या ते खंडेरायवाडी पिंपळगाव देपा येथे राहात आहे. मुलगी उज्वला व जावई मंगेश खंडागळे हेही याच ठिकाणी शेती करत होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या पूर्वी उज्वला हिने शेतात असलेल्या झाडाला साडीच्या काठाणे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उज्जवला मंगेश खडांगळे यांचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र काल विवाहित उज्वलाने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी साहेबराव मेंगाळ यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक  तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे हे करत आहे.

Web Title: Suicide by hanging the married woman

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here