विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह, सासू सासरे अटकेत
राहता | Suicide: विहीर खोदण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा मानसिक छळ करण्यात आला असून या छळास कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ज्योती मोहित साळुंके वय २८ असे या विवाहितेचे नाव आहे. साळुंखे हिचे नातेवाईक नानासाहेब अनर्थे रा. चंद्रपूर ता. राहता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणातून आरोपी पती मोहित लक्ष्मण साळुंके, सासरा लक्षमण साळुंके, सासू मीना लक्षमण साळुंके यांना पोलिसांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, चार वर्षापूर्वी ज्योती हिचा विवाह साळुंकेसोबत झाला. लग्नानंतर संसार सुखाने सुरु होता. मात्र काही दिवसांपूर्वी इतर तीन आरोपींनी ज्योती हिला माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. माहेरची परिस्थिती पैसे देण्यासारखी नसल्यामुळे तिने पैसे आणले नाहीत. त्यामुळे तिचा मानसिक व शारीरक छळ सुरु केला. यामधूनच ज्योतीने आपले जीवन संपविले.
Web Title: Suicide by strangulation of a married woman