…म्हणून ऑन कॅमेरा बोट तोडल्याची थरकाप उडविणारी घटना, गृहमंत्र्यावर केले आरोप
Satara: ऑन कॅमेरा आपले बोट तोडल्याची थरकाप उडवल्याची घटना घडली. आपल्या भावाच्या आत्महत्ये प्रकरणी (Suicide) चौकशीत पोलिसांकडून दिरंगाई.
फलटण: सातारा जिल्ह्यातील फलटण येथील धनंजय ननावरे यांनी ऑन कॅमेरा आपले बोट तोडल्याची थरकाप उडवल्याची घटना घडली. आपल्या भावाच्या आत्महत्ये प्रकरणी चौकशीत पोलिसांकडून दिरंगाई होत असून आरोपींना पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त्याने हे धक्कादायक कृत्य केले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजय ननावरे यांचे बंधू नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्ट रोजी आपल्या पत्नीसहित इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात काही लोकांचे नावे असलेली चिठ्ठी सापडली होती. पण या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत धनंजय ननावरे यांनी कॅमेरा सुरू करून आपल्या हाताचे बोट तोडले. या घटनेनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
तर तोडलेले बोट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी प्रत्येक आठवड्याला गृहमंत्र्यांना माझ्या शरिराचा एक भाग तोडून भेट म्हणून देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ शूट करत त्यांनी बोट तोडलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हाताचे बोट तोडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी केलेला हा प्रयत्न आहे. ज्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांची सुद्धा नावे आहेत. माझ्या भावाने आत्महत्या करण्याच्या आधी त्यांची नावे स्पष्टपणे घेतली आहेत. तरीही पोलिस यंत्रणा काहीच करत नाही. आज त्यांच्या आत्महत्येला १८ दिवस झाले तरी राजकीय दबावातून तपास होत नाही.”
“मी चौकशी केली तर ते म्हणाले की चौकशीसाठी पुरावे नाहीयेत. पण पुरावे नाहीत असं कसं काय? त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तर नावे लिहिली आहेत. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी भाजप सरकारला माझ्या शरिराचा एक एक भाग पाठवणार आहे.” असं धनंजय ननावरे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर म्हणाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
Web Title: Suicide Case The shocking incident of breaking a finger on camera
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App