Home जालना मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली अन शिक्षकाने वर्गखोलीत घेतला गळफास

मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली अन शिक्षकाने वर्गखोलीत घेतला गळफास

जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

Suicide Children were given a break for lunch and the teacher hanged himself in the classroom

वडीगोद्री | जालना: मूळ सोलापूर येथील एका ५० वर्षीय शिक्षकाने अंबड तालुक्यातील मठतांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

केरप्पा दिगंबर घोडके (५० रा. सोलापूर, ह. मु. पाचोड) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

मठतांडा येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षक आहेत. शिक्षक केरप्पा घोडके हे मंगळवारी शाळेत आले होते. दुपारपर्यंत त्यांनी मुलांना शिकविले. मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली. नंतर ते शाळेतील वापरात नसलेल्या खोलीत गेले. तेथे लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide Children were given a break for lunch and the teacher hanged himself in the classroom

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here