Home महाराष्ट्र Suicide | धक्कादायक: सावकाराच्या जाचामुळे पती-पत्नी प्यायले विष, पत्नीचा मृत्यू

Suicide | धक्कादायक: सावकाराच्या जाचामुळे पती-पत्नी प्यायले विष, पत्नीचा मृत्यू

Suicide Husband and wife drank poison due to moneylender's test, death of wife

बुलडाणा | Buldhana: जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून चिखली तालुक्यातील वायाळ दांपत्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी आशा वायाळ यांचा मृत्यू झाला असून पती राजेंद्र वायाळ याच्यावर बुलडाणा सामान्य रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

चिखली तालुक्यातील अमडापूर येथील अवैध सावकार शुभम लेकुरवाळे याच्या कडून राजेंद्र वायाळ यांनी 20 हजार रुपये कर्जाने घेतले होते. ज्यासाठी व्याजापोटी प्रति दिवस त्यांना तब्बल 700 रुपये या अवैध सावकारास द्यावे लागत होते. दीड महिन्यात या सावकाराला तब्बल 30 हजार रुपये देऊन सुद्धा हा सावकार पैश्यांसाठी वायाळ दाम्पत्याचा छळ करत होता.

राजेंद्र वायाळ हे मिस्त्री काम करून कुटुंब चालवत असे. अशात इतक्या मोठ्या रकमेचा भरणा करण्यासाठी त्यांनी नातेवाईकाना पैशाची मागणी केली मात्र पैसे उपलब्ध न झाल्याने हा अवैध सावकार त्यांना गावात येण्यास मज्जाव करत. त्यांनी रस्त्यातच टाकरखेड मुसलमान शिवारात उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही उपचारासाठी बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान पत्नी आशा वायाळ यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपी सावकारास अटक केली असून, या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Suicide Husband and wife drank poison due to moneylender’s test, death of wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here