Home संगमनेर संगमनेर: चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

संगमनेर: चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

Suicide of a married woman due to suspicion of character

Ahmednagar | Sangamner | संगमनेर: ३१ वर्षीय विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात येत होती. या होणाऱ्या त्रासामुळे या महिलेने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या (Suicide) केली. तिच्याकडे चिट्ठी सापडली असून त्या आधारे महिलेच्या पतीने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील एकूण दहा जणांवर महिलेस आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

स्वाती शिवनाथ क्षीरसागर रा. डोळसणे ता. संगमनेर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती शिवनाथ सीताराम क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर रघुनाथ भालेराव, समीर रघुनाथ भालेराव, शैला रघुनाथ भालेराव, शिला सागर भालेराव यांच्यासह एकूण १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.   

Web Title: Suicide of a married woman due to suspicion of character

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here