कोपरगावात एक तरुणी व महिलेची आत्महत्या
Ahmednagar News: कोपरगाव तालुक्यात दोन महिलांनी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलेल्या आहेत. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना तालुक्यातील मायगाव देवी येथे घडली. ७ नोव्हेंबर रोजी रात्री पाऊणे दहा वाजता प्रतीक्षा सोमनाथ गोंधडे (वय १९, रा. मायगाव देवी) हिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या मागील अद्याप समोर आलेले नाही.
दुसरी घटना ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. आशाबाई राधाकिसन वंजारी (वय ४५, रा. शिर्डी, ता. राहाता) यांची मुलगी नीता मनोज वर्मा हिचा विवाह कोपरगाव येथील अंबिकानगर येथील मनोज कृष्णा वर्मा यांच्याशी झाला होता. तिला मोटारसायकल घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येत होती. परंतु, माहेरची परिस्थिती बेताची असल्याने पैसे देण्यास असमर्थ होते. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळास कंटाळून नीताने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत आशाबाई वंजारी यांच्या फिर्यादीवरून मनोज कृष्णा वर्मा, सुरेखा कृष्णा वर्मा व मन्या ऊर्फ प्रमेश कृष्णा वर्मा यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Suicide of a young woman and a woman in Kopargaon
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App