Home महाराष्ट्र लॉजमध्ये सीए तरुणीची आत्महत्या, मित्र स्वच्छतागृहात गेला असता

लॉजमध्ये सीए तरुणीची आत्महत्या, मित्र स्वच्छतागृहात गेला असता

Sangli Suicide News: सनदी लेखापाल (सीए) तरुणीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला.

Suicide of CA girl in lodge

सांगली: येथील कोल्हापूर रस्त्यावरील एका लॉजवर अस्मिता मिलिंद पाटील (वय 33, रा. शारदा गृहनिर्माण संस्था, कुपवाड रस्ता, सांगली, सध्या रा. पुणे) या सनदी लेखापाल (सीए) तरुणीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला. शहर पोलिसांनी प्रथमदर्शनी आत्महत्या म्हणून दखल घेतली आहे. लॉजवर तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राकडे चौकशी केली जात आहे.

शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. त्याची माहिती संबंधित तरुणाने पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह उतरवून घेतला. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. सहायक निरीक्षक विजय नार्वेकर यांनी सांगितले. की, व्हिसेरा राखून ठेवला असून,पुढील तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी आत्महत्येची नोंद केली आहे. तरुणीच्या नातेवाइकांनी अद्याप कोणतीही तक्रार दिलेली नाही.

अस्मिता ही सनदी लेखापाल म्हणून पुण्यात काम करायची. तिचे सांगलीला वरचेवर येणे होते. शुक्रवारीही ती सांगलीला येऊन लॉजमध्ये खोली घेऊन राहिली होती. सोबत तिचा मित्रही होता. पहाटे साडेचारच्या सुमारास तो स्वच्छतागृहात गेला. बाहेर आला, तेव्हा अस्मिताने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले.

मित्र असलेल्या पोलीसपुत्राकडे चौकशी

अस्मितासोबत असलेला मित्र निवृत्त पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. शुक्रवारी ती सांगलीत आल्यापासून तिच्या मृत्यूपर्यंतच्या कालावध साक्षीदार आहे. त्यामुळे पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत आहेत.

Web Title: Suicide of CA girl in lodge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here