Home कोल्हापूर प्रेमी युगुलाची आत्महत्या, प्रियकराच्या घरात गळफास, संदेश ठेवत संपविले जीवन

प्रेमी युगुलाची आत्महत्या, प्रियकराच्या घरात गळफास, संदेश ठेवत संपविले जीवन

Kolhapur: संदेश ठेवून प्रेमी युगुलाची आत्महत्या (Suicide), प्रियकराच्या घरात घेतला गळफास.

Suicide of Lovers, hanging in Lover's house Instagram msg

शिरोली | कोल्हापूर: ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यासोबत मरायला पण तयार आहे. प्रेम करताना त्याची जात- धर्म बघून प्रेम करू नका. कारण सगळेच सारखे नसतात, असा संदेश इन्स्टाग्रामवर ठेवत अल्पवयीन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

दोघांनीही येथील रेणुकानगरमधील प्रियकराच्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेत जीवन संपविले. शिरोली (ता. हातकणंगले) येथे शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

आत्महत्या केलेला तरुण आणि युवती ही दोन भिन्न धर्मातील आहेत. आत्महत्या केलेला तरुण १८ वर्षांचा तर युवती १६ वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोघांच्याही कुटुंबीयांचा प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली होती.

तिच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोखंडी पाइपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत जीवन संपवले.

हे दोघेही एकाच गल्लीत राहत असून गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, त्यास दोन्हीही कुटुंबीयांचा विरोध होता. दोघांनाही परस्पर कुटुंबीयांनी समज दिली होती.

Web Title: Suicide of Lovers, hanging in Lover’s house Instagram msg

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here