Home राष्ट्रीय बलात्कार पीडीतेची पोलीस ठाण्यात आत्महत्या

बलात्कार पीडीतेची पोलीस ठाण्यात आत्महत्या

बलात्कार पीडीतेची पोलीस ठाण्यात आत्महत्या

शहाजहांपुर : – उत्तर प्रदेशातील शहाजहांपुर जिल्ह्यातील सोन गावातील एका अठ्ठावीस वर्षीय महिलेवर एका ‍व्यक्तीने बलात्कार केल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत सदर विवाहितेने पोलीस ठाण्यातच जाळुन घेऊन आत्महत्या केली असुन, या प्रकराणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवुन घेण्यास नकार दिल्यानंतर तिच्यावर आरोपी विनय कुमारबरोबर तडजोड करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने ती नाराज झाली होती, असा आरोप मयत विवाहितेचा पती रामवीर याने केला आहे. याबाबतित अधिकाऱ्यांने सांगितले की, २९ ऑगस्ट रोजी या महिलेला भाजलेल्या अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे ती मरण पावली . सदर विवाहितेवर बलात्कार करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची आरोपीविरुध्द तक्रार दाखल केली आहे. दरम्यान , या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार सुभाष कुमार आणि पोलीस उपनिरीक्षक लालासिंह राणा आणि लोकेश कुमार यांना निलंबित करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक एस.एन. चिनप्पा यांनी सांगितले . आरोपी विनय कुमारला अटक करण्यात आली अ सुन , या प्रकरणी आरोपी आणि मयत विवाहितेते तडजोड घडवुन आणण्याचा प्रयत्न  केला असेल, त्यांच्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल, असे चिन्नपा म्हणाले.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here