Home महाराष्ट्र धक्कादायक! स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून पोलिसानं संपवलं जीवन

धक्कादायक! स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून पोलिसानं संपवलं जीवन

Mumbai News: पोलिसाने स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.

Suicide policeman ended his life by shooting himself in the head

मुंबई: मुंबईच्या भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्याम वरगडे असे आत्महत्या केलेल्या  पोलीस हवालदाराचे नाव आहे.  ते ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मध्ये कार्यरत होते.

श्याम वरगडे यांची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागपाडा पोलीस दाखल झाले. वरगडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या हवालदाराने एवढं टोकाचं पाऊल का उचललं?  याबाबत आता नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Suicide policeman ended his life by shooting himself in the head

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here