Home संगमनेर गुंजाळवाडी: पुरवठा निरीक्षकाला कार्यालयातच धक्काबुक्की, तीनशे नागरिकांवर गुन्हा दाखल

गुंजाळवाडी: पुरवठा निरीक्षकाला कार्यालयातच धक्काबुक्की, तीनशे नागरिकांवर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner: पुरवठा निरीक्षकांना गैरकायद्याने जमाव गोळा करून घेराव घातला आणि दमदाटी, धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा जणांसह २५० ते ३०० नागरिकांवर विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल.

supply inspector was beaten up in the office, a case was registered against three hundred citizens

संगमनेर: स्वस्त धान्य दुकानाच्या ताब्यावरुन गुंजाळवाडीचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी गुरुवार दि. २८ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास थेट तहसील कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला. मात्र, याप्रकरणी पुरवठा निरीक्षकांना गैरकायद्याने जमाव गोळा करून घेराव घातला आणि दमदाटी, धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा जणांसह २५० ते ३०० नागरिकांवर विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक गणेश सुभाष भालेराव (वय ३३) हे कार्यालयात कामकाज करत असताना गुंजाळवाडी येथील २५० ते ३०० ग्रामस्थ आले आणि घेराव घातला. त्यानंतर तुम्ही विलास आबाजी गुंजाळ यांना स्वस्त धान्य पूर्ववत करण्याचा आदेश का दिला? अशी विचारणा करून दमदाटी, सरकारी धक्काबुक्की करत कामात अडथळा आणला. तसेच आचारसंहिता सुरू असतानाही गैरकायद्याने जमाव गोळा करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

याप्रकरणी गणेश भालेराव यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहा जणांसह २५० ते ३०० जणांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह दमबाजी आणि धक्काबुक्की करणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लोखंडे हे करत आहे.

Web Title: supply inspector was beaten up in the office, a case was registered against three hundred citizens

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here